41 वर्षीय रुग्णाच्या शरीरातून काढली 12 किलो वजनाची मूत्रपिंडे

गोव्यातील एका रुग्णावर दुर्मिळ शस्त्रक्रिया करून मुंबईतील परळच्या ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल 12.8 किलो वजनाची मूत्रपिंडे काढून टाकली आहेत. इतक्या जास्त वजनाची मूत्रपिंडे काढल्याची हिंदुस्थानातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

41 वर्षीय रोमन हे ऑटोसोमल पॉलिसिस्टिक किडनी डिसीज (एडीपीकेडी) हा अनुकंशिक घातक आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर डायलिसीस सुरू होते. या आजारात मूत्रपिंडामध्ये अनेक गळू तयार होतात. त्यामुळे मूत्रिपिंडाच्या ऊतींची कार्यक्षमता कमी होते. रुग्णाचे आयुष्य बिकट झाले होते. त्यामुळे त्यांनी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जाण्याची शिफारस करण्यात आली. या हॉस्पिटलमधील स्कॅप प्रत्यारोपण नोंदकहीमध्ये असलेल्या दात्यांच्या नोंदीच्या माध्यमातून ग्लोबल हॉस्पिटलमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ञांना सुयोग्य मूत्रपिंड मिळाले.

रोमन यांच्या पत्नीने तिचे मूत्रपिंड अमरावतीतील रुग्ण नितीन यांना दिले तर नितीन यांच्या पत्नीने त्यांचे मूत्रपिंड रोमन यांना दिले. डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेतून रोमन यांच्या शरीरातून 7 किलो क 5.8 किलो कजनाची मूत्रपिंडे काढून टाकली. ग्लोबल हॉस्पिटलमधील युरोलॉजी क रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव आणि ग्लोबल हॉस्पिटलच्या इन्स्टिटय़ूट ऑफ रेनल सायन्सेसचे संचालक डॉ. भरत शहा यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वी पणे मूत्रपिंडे काढली आणि त्याचकेळी स्कॅप किडनी ट्रान्सप्लांटेशनची शस्त्रक्रिया करून या रुग्णाला नवसंजीवनी दिली, अशी माहिती ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर यांनी दिली.

  • सामान्य मूत्रपिंडाचे कजन सुमारे 150 ग्रॅम असते आणि त्याची लांबी सुमारे 8-10 सेमी असते.
  • पण रोमन यांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या मूत्रपिंडांचे वजन सुमारे 26 सेमी आणि 21 सेमी होते.
  • त्यामुळे त्यांच्यावर लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. ओपन शस्त्रक्रिया करण्यात आली असे युरोलॉजी व रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव यांनी सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या