India Pakistan War – नूरखान, रफिकी, मुरीद आणि रहीम यार खान एअरबेस हिंदुस्थानने उडवले; पाकिस्तानला जबरदस्त तडाखा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढत चालल्या असून हिंदुस्थानही याला चोख प्रत्युत्तर देत आहे. शनिवारी पहाटे पाकिस्तानने हिंदुस्थानच्या लष्करी तळांसह नागरी भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावत हिंदुस्थानने जोरदार प्रतिहल्ला केला असून रावळपिंडीतील नूरखान एअरबेअस, पंजाब प्रांतातील शोरकोटमधील रफिकी एअरबेस, चकवालमधील मुरीद एअरबेस आणि रहीम यार खान एअरबेस उडवले आहेत.

India Pakistan War – पाकिस्तानी सैन्याची चौकी, ड्रोन लॉन्चपॅड बेचिराख; हिंदुस्थानचा जोरदार पलटवार

पाकिस्तानने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानवर हवाई हल्ले केले. लष्करी तळ, नागरी वस्ती, शाळा, रुग्णालये यांना पाकिस्तानने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यासाठी पाकड्यांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांचा वापर केला. तसेच सीमेजवळील गावांवर गोळीबार आणि तोफगोळेही डागले. दरम्यान, पाकिस्तानचे बहुतांश ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले हिंदुस्थानने परतवून लावले. हिंदुस्थानने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी चौकी, दहशतवादी लॉन्चपॅड आणि ड्रोन लॉन्चपॅड उद्ध्वस्त केले. तसेच पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील किमान तीन ते चार एअरबेस उद्ध्वस्त केले.

दरम्यान, शनिवारी पहाटे जम्मू-कश्मीरमधील उधमपूर भागामध्ये मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट उठताना दिसले. तसेच राजौरी येथे पाकिस्तानने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पंजाबच्या जालंधरमधील ग्रामीण भागात ड्रोनसदृश वस्तुच्या स्फोटामुळे घराचे नुकसान झाले.

पाकड्यांनी दिल्लीवर डागलं ‘फतेह-2’ क्षेपणास्त्र, हिंदुस्थाननं हवेतच केलं नष्ट; हरयाणातील सिरसामध्ये सापडले अवशेष