हिंदुस्थानची सागरी ताकद वाढणार, एक लाख कोटीच्या दोन पाणबुड्यांचा करार लवकरच

चीनची समुद्री ताकद वाढत आहे. अशातच हिंदुस्थानदेखील मागे नाही. हिंदुस्थानही हिंद महासागरात आपले सामर्थ्य वाढवत आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत एक लाख करोड रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या दोन पाणबुड्यांच्या कराराला अंतिम रुप दिले जाणार आहे. पहिली योजना तीन स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदीची आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. हा प्रकल्प माझगाव डॉक लिमिटेड ही सरकारी कंपनी आणि प्रान्सचे नेव्हल ग्रुप संयुक्तपणे करणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने सुमारे 36 हजार कोटी रुपयांच्या या कराराला दोन वर्षांआधी मंजुरी दिली होती. मात्र या योजनेच्या अंतिम रुप द्यायला उशीर झाला. आणखी एका योजनेवरही सरकारचे लक्ष्य आहे. या योजनेत 65 हजार रुपये खर्चून सहा डिझेल इलेक्ट्रीक स्टिल्थ पाणबुड्यांची खरेदी आहे. या खरेदीला मंत्रालयाने 2021 मध्ये मंजुरी दिली होती. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत दोन्ही करारांना अंतिम रुप दिले जाईल, अशी आशा आहे.

जर्मनीची जहाज निर्माता कंपनी ‘थिसेनक्रुप मरीन सिस्टीम’ने 6 डिझेल इलेक्ट्रिक स्टील्थ पाणबुड्या निर्माण करण्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत हे काम होईल. या प्रकल्पावर लवकरच चर्चा होईल. करार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 6 ते 9 महिन्यांचा कालावधी लागेल.