हिंसाचाराला लोकशाहीत धारा नाही – पंतप्रधान मोदी

543

नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विरोध प्रदर्शन सुरू आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘नागरिकत्व कायद्याबाबत हिंसक निषेध करणे दुर्दैवी आणि दुःखद आहे. अफवा पसरून जनतेत फूट टाकणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत त्यांनी, ‘हा कायदा आपले बंधुत्व दर्शविणारा आहे.’ असे म्हटले आहे.

ट्विटमध्ये मोदी म्हणाले आहे की. ‘वादविवाद, चर्चा आणि मतभेद हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे आणि सामान्य जीवनास हानी पोहोचविणे हा आपला स्वभाव नाही.’

ते पुढे म्हणाले की, ‘आम्हाला सर्व देशवासीयांना सांगायचे आहे की नागरिकत्व कायद्यामुळे कोणत्याही हिंदुस्थानी नागरिकाचे नुकसान होणार नाही. या कायद्यामुळे कोणत्याही हिंदुस्थानी नागरिकाला घाबरून जाण्याची गरज नाही. हा कायदा त्या लोकसांसाठी आहे, जे दुसऱ्या देशात अत्याचार सहन करत होते. त्याच्याकडे हिंदुस्थानात येण्याशिवाय कोणताही मार्ग नव्हता. ‘

आपली प्रतिक्रिया द्या