बुमराह, सिराजबद्दल वर्णद्वेषी शेरेबाजी, टीम इंडियाची सामनाधिकाऱयांकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱया दिवशी सिडनी मैदानावर जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज या हिंदुस्थानच्या वेगवान जोडगोळीला सीमारेषेवर वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावरील प्रेक्षकांच्या या हुल्लडबाजीबद्दल हिंदुस्थानी संघाने सामनाधिकाऱयांकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे.

दुसऱया आणि तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह या हिंदुस्थानी गोलंदाजांना शिवीगाळ करून वर्णद्वेषी शेरेबाजीही केली. या शेरेबाजीचा अतिरेक झाल्याने कर्णधार अजिंक्य रहाणेने मैदानावरील पंचांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. तिसऱया दिवसाचा खेळ संपल्यानंतर हिंदुस्थानी ड्रेसिंग रूमच्या बाहेर ‘टीम इंडिया’च्या अधिकाऱयांनी ‘आयसीसी’ व स्टेडियमवरील सुरक्षा अधिकाऱयांशी चर्चा केली. या चर्चेत बुमराह, सिराज यांच्यासह कर्णधार रहाणे व रविचंद्रन अश्विन उपस्थित होते. या वर्णद्वेषी शेरेबाजीबद्दल त्यांनी पंच पॉल रिफिल व पॉल विल्सन यांच्याशी चर्चा केली.