रोहित शर्मा, इशांत शर्मा कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

हिंदुस्थानी क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा व उंचपुरा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोघांनाही दुखापतीमधून पूर्णपणे फिट होण्यासाठी अवधी लागणार असून त्यानंतर ऑस्ट्रेलियातील क्वारंटाइनचा नियम व सरावाचा अभाव याचाही फटका यावेळी बसणार आहे. सध्या तरी किमान दोन कसोटी या दोघांना खेळता येतील अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगू लागली आहे. मात्र बीसीसीआयकडून अद्याप कोणताही निर्णय याबाबत घेण्यात आलेला नाही. रोहित शर्मा अद्यापही दुखापतीमधून पूर्णपणे बरा झालेला नाहीए. आयपीएलनंतर हिंदुस्थानी खेळाडूंसोबत तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असता तर कसोटी मालिकेत त्याला खेळता येऊ शकले असते, पण आता त्याची दुखापत, क्वारंटाइनचा कालावधी व सरावाचा अभाव या सर्व बाबींमुळे त्याला कसोटी मालिकेत खेळता येणे अवघडच असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या