
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात नॉटिंघम येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला. हा सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानच्या संघाला अखेरच्या दिवशी 157 धावांची गरज होती आणि त्यांच्या नऊ विकेट्स बाकी होत्या. मात्र पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला.
UPDATE: Play has been abandoned. ☹️
The first #ENGvIND Test at Trent Bridge ends in a draw.
We will see you at Lord’s for the second Test, starting on August 12. #TeamIndia
Scorecard https://t.co/TrX6JMzP9A pic.twitter.com/k9G7t1WiaB
— BCCI (@BCCI) August 8, 2021
इंग्लंडचा दुसरा डाव टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 303 धावांमध्ये गुंडाळला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने धारधार गोलंदाजी करत पाच बळी मिळवले. त्याला शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनीही चांगली साथ दिली.
चौथ्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडने दिलेल्या 209 धावांच्या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एक गडी गमावून 52 धावा केल्या. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा सध्या मैदानात होते. पाचव्या दिवशी 157 धावांचे आव्हान पार करून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची संधी हिंदुस्थानकडे होती. मात्र नॉटिंघममध्ये दिवसभर पाऊस कोसळल्याने सामना अनिर्णित राहिला.





























































