हिंदुस्थान-इंग्लंड पुन्हा भिडणार, पुढल्या वर्षी वन डे व टी-20 मालिकेचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाच कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. दोन देशांमध्ये चार कसोटी सामने पार पडले असून या मालिकेतील थरार तमाम क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे. आता याच दोन संघांमध्ये पुढल्या वर्षीदेखील क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये 2022 सालामध्ये जुलै महिन्यात तीन टी-20 व तीन वन डे मालिका खेळवण्यात येणार आहे, अशी माहिती इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून बुधवारी देण्यात आली. पुढल्या मोसमातील इंग्लंड क्रिकेट संघाच्या मालिकांचे वेळापत्रकाची घोषणा यावेळी करण्यात आली.

हिंदुस्थान-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
पहिली टी-20 – 1 जुलै – ओल्ड ट्रपर्ह्ड
दुसरी टी-20 – 3 जुलै – ट्रेंटब्रीज
तिसरी टी-20 – 6 जुलै – एजेस बाऊल
पहिली वन डे – 9 जुलै – एजबॅस्टन
दुसरी वन डे – 12 जुलै – किया ओव्हल
तिसरी वन डे – 14 जुलै – लॉर्ड्स