IND vs ENG बुमराच्या दणक्यानंतरही इंग्लंड 387, हिंदुस्थानही 3 बाद 145 अशा संघर्षमय स्थितीत

जसप्रीत बुमराने बेन स्टोक्स, ज्यो रुट आणि ख्रिस व्होक्स या तिघांच्या दांडय़ा उडवत इंग्लंडच्या पहिल्या डावाची बत्ती गुल केली होती, पण सुपर फॉर्मात असलेल्या जॅमी स्मिथने ब्रायडन कार्सच्या साथीने 84 धावांची भागी रचल्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यानंतर हिंदुस्थाननेही सावध पवित्रा घेत फलंदाजी केली. तरीही हिंदुस्थान आपल्या 3 विकेट गमवाव्या लागल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर हिंदुस्थान 3 बाद 145 अशा स्थितीत पोहोचला. खेळ थांबला तेव्हा केएल राहुल 53 तर ऋषभ पंत 19 धावांवर खेळत होता.

बॅझबॉलला गुंडाळून पारंपरिक कसोटी क्रिकेटच्या ट्रकवर परतलेल्या इंग्लंडची गुरुवारी 4 बाद 251 अशी दमदार स्थिती होती. गुरुवारी नाबाद 99 धावांवर असलेल्या ज्यो रुटने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराला चौकार ङ्खोकत आपले 37 वे कसोटी शतक झळकवले. पण बुमराने दुसऱया षटकात इंग्लंडची दांडी गुल करत ही जोडीही पह्डली आणि इंग्लंडला सकाळी सकाळीच हादरवले. त्यानंतर तिसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रुटची अलगद यष्टी वाकवत सनसनाटी निर्माण केली. बुमराचा चेंडू इतका भन्नाट होता की, रुटला कळण्याच्या आधीच तो त्रिफळाचीत झाला. मग पुढच्याच चेंडूवर ख्रिस व्होक्सचाही त्रिफळा उडवून खळबळ माजवली. बुमराला हॅटट्रिकची संधी होती, पण ब्रायडन कार्सने ती होऊ दिली नाही. अवघ्या 20 धावांत 3 फलंदाज बाद झाल्याने इंग्लंडचे पंबरडेच मोडले होते. पण बुमराच्या मेहनतीवर जॅमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सने पाणी फेरले. स्मिथने सलग तिसरी अर्धशतकी खेळी करताना 56 चेंडूंत 51 धावा केल्या. इंग्लंडने आक्रमक फलंदाजी बाजूला ङ्खेवली असली तरी स्मिथ आणि कार्सने 350 धावांचा टप्पा गाङ्गून दिला.

रुटचे आणखी एक पाऊल

सचिन तेंडुलकरच्या कसोटीतील धावा आणि शतकांचा पाङ्गलाग करत असलेल्या ज्यो रुटने त्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलेय. त्याने आपले 37 वे शतक साजरे करताना कसोटी शतकवीरांच्या यादीत पाचवे स्थान काबीज करताना स्टीव्ह स्मिथ आणि राहुल द्रविड या 36 शतकांच्या दिग्गजांना मागे टाकले. आता रुटच्या पुढे सचिन तेंडुलकर (49), जॅक पॅलिस (45), रिकी पॉण्टिंग (41) आणि कुमार संगक्कारा (38) हे चौघे आहेत. तसेच धावांच्या बाबतीतही हे चौघे शतकवीर रुटच्या पुढे आहेत. तो कसोटी इतिहासात 13 हजार धावांचा टप्पा गाङ्गणाराही पाचवाच फलंदाज असून पहिला इंग्लिशमन आहे.

बुमराने कपिलला मागे टाकले

आज बुमरा जबरदस्त फॉर्मात होता. दिवसाच्या प्रारंभीच तीन त्रिफळे उडवत त्याने इंग्लंडला 300 च्या आत गुंडाळण्याचे प्रयत्न केले. पण ते प्रयत्न स्मिथ आणि कार्सने पूर्ण होऊ दिले नाही. दोघांनी हिंदुस्थानी गोलंदाजांना रोखत इंग्लंडला अपेक्षित धावसंख्येच्या दिशेने नेले. अखेर ही जोडी सिराजने पह्डली आणि मग बुमराने जोफ्रा आर्चरचाही त्रिफळा उडवत 13 व्यांदा परदेशात डावात 5 विकेट टिपण्याचा पराक्रम केला. तसेच कपिल देवचा 12 वेळा परदेशात 5 विकेट घेण्याच्या विक्रमालाही मागे टाकले. आता आशिया खंडाबाहेर ही कामगिरी करणारा तोच सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याने 74 धावांत 5 विकेट टिपले. तसेच सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवले.

हिंदुस्थानचाही सावध खेळ

इंग्लंडने आपली बॅझबॉल शैली म्यान केल्यानंतर हिंदुस्थाननेही आपल्या फलंदाजीत सावध पवित्रा पत्करला. यशस्वी जैसवालने 3 चौकारांसह खणखणीत सुरुवात केली, पण जोफ्रा आर्चरने आपल्या तिसर्याच चेंडूवर जैसवालला बाद करत आपले पुनरागमन साजरे केले. दुसऱ्या षटकात जैसवाल बाद झाल्यानंतर राहुल आणि करुण नायरने सावध खेळालाच प्राधान्य दिले. तरीही नायरच्या बॅटमधून अधूनमधून चौकार निघत होते. पण त्याची खेळी अर्धशतकापर्यंत पोहोचू शकली नाही. मग गेल्या कसोटीत विक्रमांचा पाऊस पाडणारा शुभमन गिल 16 धावांवर बाद झाला. 3 बाद 107 अशा धावसंख्येनंतर राहुल आणि पंतने इंग्लंडला चौथे यश मिळू दिले नाही.