हिंदुस्थान आणि श्रीलंकेमध्ये रणसंग्राम, महिला आशिया कपचा अंतिम सामना आज रंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यात फायनलचा सामना रंगणार आहे. त्यामुळे हिंदुस्थान पुन्हा एकदा आशिया चषकाला गवसणी घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

शेफाली आली फॉर्मात

स्मृती मानधना या स्पर्धेत सातत्याने धावा करताना दिसत आहे. पण शेफालीला फॉर्मची चिंता सतावत होती. पण गेल्या सामन्यात शेफालीने दणकेबाज फटकेबाजी केली होती. त्यामुळे तिने जर आपला हा फॉर्म कायम राखला तर हिंदुस्थानला दणदणीत सुरुवात मिळू शकते.

मधल्या फळीने चिंता वाढवली

आतापर्यंतच्या स्पर्धेत मधल्या फळीला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. प्रतिका रावल तिसऱया स्थानावर अपयशी ठरताना दिसत आहे. कर्णधार हरमनप्रीत काwरलाही अजून सूर गवसलेला नाही. रिचा घोषकडून अपेक्षित फलंदाजी होताना दिसत नाही. त्यामुळे मधल्या फळीने हिंदुस्थानची चिंता वाढवली आहे.

फिरकी गोलंदाजीची कमाल

हिंदुस्थानने आतापर्यंत जे सामने जिंकले आहेत ते फिरकीच्या जोरावरच जिंकले आहेत. दीप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. प्रेमा रावतही चांगली फिरकी गोलंदाजी करत आहे, तर शेफालीने आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांना चांगलेच नाचवले आहे. त्यामुळे हिंदुस्थानला जर विजय मिळवायचा असेल तर त्यांच्यासाठी फिरकी गोलंदाजी महत्त्वाची ठरणार आहे.