IndVsSL – टी-20 वर्ल्डकपसाठी नवोदितांची रंगीत तालीम, हिंदुस्थान-श्रीलंका पहिली टी-20 लढत आज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच देश आता संघबांधणीच्या कामाला लागले आहेत. हिंदुस्थान-श्रीलंका दरम्यान आजपासून लखनौमध्ये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. टी-20 वर्ल्डकपची रंगीत तालीम असलेल्या या मालिकेत विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत या दिग्गज क्रिकेटपटूंच्या गैरहजेरीत नव्या दमांच्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत नवोदित खेळाडूंच्या साथीने श्रीलंकेशी दोन हात करताना रोहित शर्माच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे. संधीची आतुरतेने वाट बघत असलेले नवोदित खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.

श्रीलंकेला आपला प्रमुख फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाची हिंदुस्थान दौऱयावर प्रकर्षाने उणीव भासणार आहे. कारण हसरंगाला ऑस्ट्रेलिया दौऱयावर कोरोनाची लागण झाल्याने तो हिंदुस्थानच्या महत्त्वपूर्ण दौऱयाला मुकलाय. हसरंगा अजूनही ऑस्ट्रेलियामध्येच क्वारंटाइन आहे. हिंदुस्थान व श्रीलंका या दोन्ही संघांत नवोदित खेळाडूंचा भरणा अधिक असल्यामुळे उभय संघांमधील टी-20 मालिका चांगली रंगेल अशी अपेक्षा करूया.

सूर्यकुमार, दीपक चहर जायबंदी

मधल्या फळीतील सूर्यकुमार यादव व वेगवान गोलंदाज दीपक चहर देघेही जायबंदी झाल्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकले आहेत.

z कोहली, राहुल, पंतच्या गैरहजेरीत…

विराट कोहली, लोकेश राहुल व रिषभ पंत या दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत ईशान किशन, ऋतुराज गायकवाड व संजू सॅमसन या ंनव्या दमाच्या खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असेल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱया टी-20 लढतीत ऋतुराज व श्रेयस अपयशी ठरले होते. श्रीलंकेविरुद्ध ते अपयश धुऊन काढण्याची या दोघांना संधी असेल. विंडीजविरुद्धच्या मालिकेत व्यंकटेश अय्यरने फिनिशरची भूमिका चोखपणे बजावली होती. गोलंदाजीत थोडी सुधारणा झाल्यास टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या दिमतीला एक प्रतिभाशाली अष्टपैलू क्रिकेटपटू असेल.

उभय संघ

हिंदुस्थान ः रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

श्रीलंका ः दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुसाल मेंडिस, चरित असलंका (उपकर्णधार), दिनेश चंडीमल, दनुष्का गुणथिलका, कामिल मिशारा, जनीथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, महेश तीक्षाना, जेफरी वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, आशियान डॅनियल.