
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या दहशतवादी घटनेनंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. ज्याला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता हिंदुस्थानने पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारावर आक्षेप नोंदवला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनी काल हॉटलाइनवर चर्चा केली आणि पाकिस्तानकडून विनाकारण होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांवर चर्चा केली. नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानी सैन्याकडून विनाकारण शस्त्रसंधी उल्लंघन केल्याबद्दल हिंदुस्थानने पाकिस्तानला इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 आणि 30 एप्रिलच्या रात्री जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवरून कारण नसताना गोळीबार करण्यात आला. ज्याला हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. यातच आता हिंदुस्थानने पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारावर आक्षेप नोंदवत इशारा दिला आहे.