
सामना ऑनलाईन । लखनौ
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी एका कार्यक्रमादरम्यान रॅपिड ऍक्शन फोर्सची प्रशंसा केली. तसेच देश नक्षलवाद आणि माओवादमुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त लखनौमध्ये ते बोलत होते. देशातल्या १२६ जिल्ह्यात नक्षलवाद होता आता तो फक्त १०-१२ जिल्ह्यात उरल्याचेही त्यांनी सांगितले.
गृहमंत्री राजनाथ सिंग म्हणाले की “सीआरपीफ आणि आरएएफ च्या परक्रमाने देश नक्षलवाद आणि माओवाद मुक्त होईल त दिवस फार दूर नाही. तसेच केंद्रीय सुरक्षा दलांनी राज्याच्या पोलिसांसोबत सहकार्य करून हिंदुस्थानी जनतेत विश्वास निर्माण केला आहे.” जिथे नक्षलवाद होता तिथे विकासाची आशाही नव्हती. त्याठिकाणी या दलांनी नक्षलवादाचा खात्मा करून विकासाचे रस्ते निर्माण केले असे म्हणून त्यांनी सीआरपीफ आणि आरएएफचे कौतुक केले.





























































