
8 ऑक्टोबर हा हिंदुस्थानी हवाई दल दिन. मंगळवारी हवाई दलाची 87 वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने हवाई दलाचे वैमानिक गाझियाबाद येथील हिंडन येथे फायटर विमानांची थरारक प्रात्यक्षिकं करत आहेत. यात विंग कमांडर अभिनंदन वर्धमानही सामील असून ते मिग बिसन हे लढाऊ विमान चालवत आहेत.
या थरारक प्रात्यक्षिकांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रात्यक्षिकांचा थरार दिसून येत आहे. या प्रात्यक्षिकात चिनुक, तेजस, मिग अशा विमानांचा समावेश आहे. या विमानांची ताकद आणि ही प्रात्यक्षिकं पाहून शत्रुच्या मनात धडकी भरू शकते.
INDIAN AIR FORCE CELEBRATES 87th ANNIVERSARY https://t.co/3fdlRgxUIQ
— Indian Air Force (@IAF_MCC) October 8, 2019





























































