
हिंदुस्थानी वायुदलात कार्यरत असलेला एक कर्मचारी पाकिस्तानचा हेर निघाला. सुमित कुमार असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आरोपी सुमित हा पैशांच्या बदल्यात पाकिस्तानला लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र सिस्टमची गुप्त माहिती देत होता. राजस्थान पोलिसांनी झाबरा राम नावाच्या एका संशयिताला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून सुमित कुमारचे नाव समोर आले होते. तेव्हापासून गुप्तचर यंत्रणा सुमित कुमारवर पाळत ठेवून होत्या. त्याची खात्री पटल्यानंतर आसामच्या दिब्रुगड जिह्यातील चबुआ येथून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन जयपूरला आणले आहे. सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा आहे. तो आसाममधील चबुआ एअरफोर्स स्टेशनवर मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 2023 पासून सुमितच्या संपर्कात होत्या.




























































