हिंदुस्थानात मधुमेहापेक्षा थायरॉईडचे प्रमाण अधिक!

60

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदुस्थानात सध्या मधुमेह रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यापेक्षाही गर्भवती महिलांना होणाऱ्या थायरॉईड आजाराचे प्रमाण अधिक असून मधुमेहापेक्षा हा जास्त घातक आजार असल्याचे मेकिंग इंडिया थायरॉईड अवेअर (मिता) मोहिमेतील नामवंत डॉक्टरांनी आज सांगितले. थायरॉईडबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी  ऍबॉट, ‘आयटीएस’ आणि ‘एफओजीएसआय’ या संस्था एकत्र आल्या आहेत.

हिंदुस्थानात एक पुरुष तर तीन महिला असे थायराईडचे प्रमाण आहे. गरोदर महिलांना थायरॉईडचा आजार होतो. गरोदरपणात सगळय़ा वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. मात्र, थायरॉईडची चाचणी महाग असल्यामुळे ती केली जात नाही. थायराईडच्या आजाराचा परिणाम गर्भातील बालकावर, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे थायरॉईडबद्दल जागरुकता निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे इंडियन थायराईड सोसायटीचे (आयटीएस) सचिव आणि इंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी, ज्येष्ठ स्त्राrरोगतज्ञ आणि ‘एफओजीएसआय’चे अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर आणि ऍबॉट इंडिया लिमिटेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीरूपा दास यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या