
हिंदुस्थानी लष्कराने म्यानमारमध्ये शनिवारी मोठी कारवाई करत उल्फा आय अर्थात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम आणि एनएससीएनके अर्थात नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड खापलांग या म्यानमारमधील दहशतवादी संघटनेच्या चार तळांवर तब्बल 100 ड्रोन डागले. या हल्ल्यात तीन बडय़ा कमांडरसह उल्फाचे अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त आहे. परंतु हिंदुस्थान सरकार आणि हिंदुस्थानी लष्कराकडून या मोहिमेला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.