चीनच्या ताब्यात सोपवला लडाखमध्ये पकडलेला सैनिक

लडाखमधील तणावाच्या परिस्थितीतही कुरापतखोर चीनला हिंदुस्थानच्या दिलदार वृत्तीची प्रचिती आली. वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून हिंदुस्थानच्या हद्दीत आलेल्या चीनच्या सैनिकाला हिंदुस्थानने बुधवारी सकाळी चीनच्या ताब्यात सोपवले. त्या सैनिकाला सुखरुपरित्या मायदेशी पाठवून हिंदुस्थानने संपूर्ण जगाला आपल्या अनोख्या शिष्टाचाराचे दर्शन घडवले.

चीनच्या ग्लोबल टाईम्सचा प्रमुख संपादक हु झिनजिन याने यासंदर्भात ट्विट करून वृत्ताला दुजोरा दिला. लडाखच्या डेमचोक प्रांतात भटकत आलेल्या कॉर्पेरल वांग हा लॉन्ग या चीनी सैनिकाला हिंदुस्थानी लष्कराने सुखरूपरित्या चीनच्या ताब्यात दिले.

आपली प्रतिक्रिया द्या