हिंदुस्थानी लष्कराच्या गणवेशात 5 दहशतवाद्यांची दिल्लीत घुसखोरी

396

गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर यंत्रणांकडून दिल्लीत दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा ऍलर्ट जारी होत असताना सोमवारी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये हिंदुस्थानी लष्कराच्या गणवेशात 5 संशयित दिसल्याचे वृत्त आहे. या दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशात आल्यानंतर दिल्लीत प्रवेश केला आहे.

लष्करी तळांवर हल्ले करण्याबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती आली आहे. संशयित कार पाहिल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरयाणा आणि एनसीआरमध्ये हाय ऍलर्ट घोषित केला आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलीस यासंदर्भात हाती येत असलेल्या माहितीचे संयुक्तपणे आदानप्रदान करत आहेत. या कारमध्ये लष्करी वेश परिधान करून बसलेल्या संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्रही एनबीटीच्या हाती लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या