1 मार्चपासून नाही मिळणार 2000 ची नोट, या बँकेने घेतला मोठा निर्णय

1049

गेल्या काही दिवसांपासून दोन हजार रुपयांची नोट बंद होणार अशा सतत अफवा पसरत आहेत. मात्र आता एका मोठ्या बँकेने 2000 च्या नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन बँक या पब्लिक सेक्टरमधील बँकेच्या एटीएम मशीनमधून 2000 ची नोट न देण्याचा निर्णय घेतला आहे.

indian-bank-1

इंडियन बँकेने एक सर्क्युलर काढले असून त्यांच्या सर्व ब्रांचला याबाबत आदेश दिले आहेत. बँकेने सर्व ब्रांचना एटीएममध्ये 2 हजाराच्या नोटा न टाकण्याचे आदेश दिले आहेत. या बँकेने 2000 च्य़ा जागी 200 च्या नोटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हाला 2000 च्या नोटा हव्या असतील तर एटीएम ऐवजी बँकेत जाऊन नोटा घ्यावा लागतील.

आपली प्रतिक्रिया द्या