
सामना ऑनलाईन । मुंबई
दीपक मलिकचे दमदार शतक आणि सुनील रमेशच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर हिंदुस्थानच्या अंध संघाने येथे झालेल्या दुसऱया ट्वेण्टी-20 सामन्यात श्रीलंकेला 34 धावांनी धूळ चारली आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. हिंदुस्थानकडून मिळालेल्या 237 धावांचा पाठलाग करणाऱया श्रीलंकेला 202 धावांपर्यंत मजल मारता आली. सुनील रमेशने 20 धावा देत 2 फलंदाज बाद केले. त्याआधी दीपक मलिकने नाबाद 106 धावांची जबरदस्त खेळी साकारली.





























































