हिंदुस्थानी उद्योगपतीला अमेरिकेत अटक

अमेरिकेत राहणारे मूळचे हिंदुस्थानी बिझनेसमॅन फार्मा कंपनी सॉवरेन ग्रुपचे फाऊंडर आणि माजी सीईओ तन्मय शर्मा यांना अमेरिकेत अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर 1276 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. फेडरल ग्रँड जुरी यांनी शर्मा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. शर्मा यांनी बनावट पद्धतीने 14.9 कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास 1276 कोटी रुपयांचे फेक पद्धतीने हेल्थकेअर विमा कंपन्यांकडून क्लेम मिळवले आहेत. यासाठी त्यांनी 2.1 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 180 कोटी रुपयांची रक्कम लाच म्हणून दिली आहे. या प्रकरणात त्यांचे साथीदार पॉल जिन सिन यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे. दक्षिण कोरियात नशा मुक्ती केंद्र चालवणारे तन्मय शर्मा यांच्या सॉवरेन ग्रुपविरोधात 2017 पासून चौकशी सुरू आहे. ही संस्था आता बंद झाली आहे.