क्रिकेटपटूंनी आपल्या मर्जीनुसार वागू नये,मोहिंदर अमरनाथ यांचे परखड मत

633

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धकाधकीच्या वेळापत्रकामुळे सध्या हिंदुस्थानी संघातील नावाजलेले खेळाडू स्वतःच्या मर्जीनेच काही सामन्यांतून किंवा मालिकांमधून माघार घेताना दिसताहेत. पण हिंदुस्थानात सुरू होत असलेली ही प्रथा योग्य नव्हे. खेळ मोठा आहे, खेळाडू नव्हे. स्थानिक क्रिकेटमध्ये असंख्य खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी जीवाचे रान करीत असतानाच स्टार खेळाडू एकही स्थानिक सामना न खेळता संघात पुन्हा पुनरागमन करतात. खेळाडूंनी आपल्या मर्जीनुसार वागू नये, असे परखड मत माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांनी यावेळी व्यक्त केले.

धवनचा पर्यायी खेळाडू निवडावा
अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने दुखापतीमधून बरे होत टीम इंडियात पुनरागमन केले, पण त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. तो सुमार फॉर्ममधून जातोय. त्यामुळे आता टीम इंडियाने त्याचा पर्यायी खेळाडू निवडावा, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या