जिन्मॅस्टिकमध्ये हिंदुस्थानच्या नावाचा डंका वाजवणारी स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हीने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
दीपा कर्माकरने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. ती म्हणाली की, “खूप विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला असून जिन्मॅसिटकमधून मी निवृत्ती घेत आहे. हा निर्णय घेणं खूप कठीण आहे. पण हीच योग्य वेळ आहे, असे म्हणत तीने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. ती पुढे म्हणाली की, जिम्नॅस्टिक माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक राहिला आहे. मला ती 5 वर्षांची दीपा आठवत आहे, तिला सर्वजण बोलायचे की सपाट पायांमुळे ती कधीच जिम्नॅस्ट होऊ शकत नाही. आज मला हे यश पाहून खूप अभिमान वाटत आहे,” अशा पद्धतीची भावनिक पोस्ट करत दिपा कर्माकरने निवृत्ती घेतली आहे.
दीपा कर्मकर हिंदुस्थानातील आघाडीची जिम्नॅस्टिक खेळाडू आहे. तिने 2014 साली राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत पदक जिंकले होते. विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत जिम्नॅस्टिमध्ये पदक जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला ठरली होती. त्याचबरोबर 2016 साली रिओ ऑलिम्पकध्ये सहभागी होणारी ती हिंदुस्थानची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. या स्पर्धेत तिचे पदक थोडक्यात हुकले होते. मात्र पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत चौथ्या क्रमांकावर तिने झेप घेतली होती. याव्यतिरिक्त 2018 साली झालेल्या एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी दीपा पहिली हिंदुस्थानी ठरली होती.