
सोशल मीडिया कंपनी मेटाने हिंदुस्थानमधील अवघ्या 23 वर्षीय आयटी इंजिनीअर तरुणाला 3.6 कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली आहे. मनोज टुमू असे तरुणाचे नाव आहे. मनोजने याआधी अॅमेझॉनमध्ये कामे केलेले आहे. तो आता मेटाच्या अॅडव्हर्टायजिंग रिसर्च टीममधील मशीन लार्ंनग सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणार आहे. मेटाची ही ऑफर आपण स्वीकारली आहे, असे मनोजने सांगितले आहे. अॅमेझॉनमध्ये खूप काही शिकायला मिळाले आहे. आता मेटामध्ये काम करण्यास उत्सुक आहे, असे मनोजने सांगितले. एआय आणि मनीश लार्ंनग क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक तरुणांना मनोजने खास टिप्स दिल्या आहेत. इंटर्नशीप करताना पगाराकडे न पाहता स्किल्स कशी शिकता येईल, याकडे तरुणाने लक्ष द्यायला हवे, असे मनोजने म्हटले आहे.