
हिंदुस्थानात जुगाड या पद्धतीचा जितका वापर केला जातो तितका क्वचितच एखाद्या देशात केला जात असेल. अनेक लोक आपला शौक पूर्ण करण्यासाठी स्वस्तात मस्त पर्याय म्हणून देशी जुगाड करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका रिक्षाचालकाच्या जुगाडाची जोरदार चर्चा आहे. या रिक्षाचालकाने चक्क आपल्या रिक्षाचे स्कॉर्पिओ कारमध्ये रूपांतर केले आहे. त्याने रिक्षा अशा पद्धतीने मॉडीफाय केली आहे की, मागच्या बाजूने बघितल्यास ती स्कॉर्पिओ कार असल्याचे वाटते, मात्र पुढच्या बाजूने पाहिल्यास ती ऑटोरिक्षा असल्याचे दिसते. सध्या या रिक्षाचा काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण रिक्षाचालकाच्या मेहनतीचे कौतुक करत आहेत.



























































