उमेद – मानवतेची देवी

>>शैलेश धारकर

तुर्कीतील भूकंपानंतर 14 डॉक्टर, 86 पॅरामेडिकल कर्मचाऱयांचा समावेश असलेली हिंदुस्थानी एनडीआरएफ टीम तुर्कस्तानला गेली. उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये जीव शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. या टीमचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये बीना तिवारी या एकमेव महिला मेजर अधिकारी आहेत. त्यांचे फोटो संपूर्ण तुर्कीमध्ये व्हायरल होत आहेत. तुर्कीत त्यांना मानवतेची देवी म्हटले जाते. एनडीआरएफने आपल्या मदतकार्याला ऑपरेशन दोस्त असे नाव दिले. मेजर डॉ. बीना तिवारी यांनी लहान मुले, महिला, वृद्ध लोक यांच्याशी प्रेमाने केलेली अप्रतिम वागणूक आणि त्यांच्या अत्यंत सहानुभूतीपूर्ण वर्तनाने सर्वांची मने जिंकली.

नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे तुर्कस्तान एवढा उद्ध्वस्त झाला आहे की, त्यातून सावरणे कठीण होत आहे. हिंदुस्थानने तुर्कस्तानला  मदत करण्यासाठी आपली एनडीआरएफ टीम म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण टीम भूकंपग्रस्त भागात गेली होती. या टीमने तिथे एवढे चांगले काम केले की, तेथील लोक या टीमला भरभरून आशीर्वाद देत आहेत. हा तोच तुर्किये ज्याचे नाव कालपर्यंत तुर्की होते. 

कोणतेही काम टीमवर्कशिवाय शक्य होत नाही. तुर्कीतील भूकंपानंतर 14 डॉक्टर, 86 पॅरामेडिकल कर्मचाऱयांचा समावेश असलेली  हिंदुस्थानी एनडीआरएफ टीम तुर्कस्तानला गेली. उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये जीव शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. कमीत कमी वेळेत जखमींसाठी मदत रुग्णालये उभारली आणि तिथे सर्वांवर उपचार केले. या टीमचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये बीना तिवारी या एकमेव महिला मेजर अधिकारी आहेत. त्यांचे फोटो संपूर्ण तुर्कीमध्ये व्हायरल होत आहेत. तुर्कीत त्यांना मानवतेची देवी म्हटले जाते. भूकंपानंतर अवघ्या चोवीस तासांनी एनडीआरएफने तेथे कार्यभार स्वीकारला आणि या मदत पथकाने भूकंपानंतर तीन ते चार दिवसांनी ढिगाऱयाखाली दबलेल्या अनेकांची सुटकाही केली. देशाची ही कन्या वैद्यकीय अधिकारी असून तिचे आजोबा सैन्यात सुभेदार होते. तिचे वडील कुमाऊ इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. एकूणच राष्ट्रसेवा हा त्यांच्या कुटुंबाचा धर्म आहे. 

भूकंपात जखमी झालेल्यांना वाचवणे हे एक कठीण काम होते. या भूकंपात सुमारे चाळीस हजार लोकांचा जीव गेला आहे. एनडीआरएफने आपल्या मदतकार्याला ऑपरेशन दोस्त असे नाव दिले. मेजर डॉ. बीना तिवारी यांनी लहान मुले, महिला, वृद्ध लोक यांच्याशी प्रेमाने केलेली अप्रतिम वागणूक आणि त्यांच्या अत्यंत सहानुभूतीपूर्ण वर्तनाने सर्वांची मने जिंकली. संपूर्ण तुर्की त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. यासोबतच हिंदुस्थानचे सैन्य आणि एनडीआरएफच्या ऑपरेशन दोस्तने मदतीचा हात पुढे केल्याचे सार्थ ठरले. 

ज्या जखमींवर अत्यंत संवेदनशीलतेने उपचार केले, त्यांच्या नातेवाईकांनी  डॉ. बीना यांच्यातील संवेदनशील डॉक्टरचा अनुभव घेतला. ते सांगतात की, या डॉक्टर लहान मुलांना ममतेने आपल्या मांडीवर घेतात, मोठय़ांचे ऐकतात आणि त्यांना प्रोत्साहन देतात. तसेच त्यांच्यावर उपचार करतात. प्रार्थना आणि औषध एकत्र काम करत असते. मानवतेच्या या देवीने तुर्कीतील लाखो लोकांची मने जिंकली आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनेक वृद्ध महिला आणि लहान मुली त्याच्या गालावर चुंबन घेत असल्याचे दिसत आहे.

डॉ. बीना तिवारी या डेहराडूनच्या रहिवासी आहेत. वय फक्त 28 वर्षे! दिल्लीच्या आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये पदवीधर. तुर्कस्तानमध्ये तैनात असलेली त्यांची टीम कर्नल युधवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यांचे पतीही डॉक्टर असून वैद्यकीय अधिकारी आहेत. मानवतेचे यापेक्षा मोठे उदाहरण दुसरे कुठलेच असू शकत नाही. 

बीना यांना ज्या प्रकारे सोशल मीडियावरून अनेक आशीर्वाद मिळत आहेत ते पाहता सकारात्मकता आणि चैतन्य आणि आदराने त्या मानवतेचे एक नवीन उदाहरण बनल्या आहेत.  परोपकाराच्या भावनेने गरजूंसाठी पुढे जाऊन मदत करताना देव तुम्हाला तेथील परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल करत असतो. 

बीना यांच्याप्रमाणेच कोरोनाच्या काळात हिंदुस्थानातील डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांना मोदी सरकारने कोरोना योद्धा म्हणून घोषित केले होते. सर्वजण एकत्र उभे राहिल्यामुळे देशावरील मोठे संकट टळले. डॉ.बीना तिवारी यांनी तुर्कीतील भूकंपग्रस्त रुग्णासाठी ज्या पद्धतीने आपली सेवा दिली त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. देशाच्या या धाडसी कन्येला मनापासून सलाम!