हिंदुस्थानी अमित क्षत्रिय यांच्यावर नासाची मोठी जबाबदारी

मूळचे हिंदुस्थानी वंशाचे असलेल्या अमित क्षत्रिय यांच्यावर नासाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. अमित यांना नवीन सहायक प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. हे नासातील सर्वात मोठे सरकारी पद आहे. याची घोषणा गुरुवारी नासाचे प्रशासक सीन पी. डफी यांनी केली. क्षत्रिय हे गेल्या 20 वर्षांपासून नासात कार्यरत आहेत.