हिंदुस्थानी महिलेला कॅलिफोर्नियात अटक

अमेरिकेत 30 वर्षांहून अधिक काळ राहणाऱया हिंदुस्थानी महिलेला अचानक अटक करण्यात आली आहे. बबलजीत कौर ऊर्फ बबली (60) असे या महिलेचे नाव आहे. ग्रीन कार्ड मुलाखतीसाठी त्या अमेरिकी इमिग्रेशन एंड कस्टम्स एन्फोर्समेंटच्या कार्यालयात बायोमेट्रिक स्कॅनसाठी गेल्या होत्या. त्याच वेळी अमेरिकन फेडरल एजंटने त्यांना अटक केली.

बबलजीत यांची मुलगी ज्योतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई आयसीई ऑफिसच्या फ्रंट डेस्कवर उभी होती. त्याच वेळी फेडरल एजंट आत आले. बबलजीत कौर यांना एका खोलीत बोलावले आणि लगेच अटक केली. अटक केल्यानंतर अनेक तास उलटून गेल्यानंतरही बबलजीत कौर यांना कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली, याची माहिती देण्यात आली नाही. बबलजीत कौर या 1994 पासून अमेरिकेत राहत आहेत. बबलजीत कौर यांना तीन मुले आहेत.