नोकराचे शोषण केल्याप्रकरणी हिंदु्स्थानी दांपत्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

दक्षिण इंग्लंडमध्ये नोकराचे शोषण केल्याप्रकरणी एका हिंदुस्थानी दांपत्याला अटक करण्यात आली आहे. चार वर्ष नोकराचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप या दांपत्यावर ठेवण्यात आला आहे. पलविंदर (55) आणि प्रीतपाल (54) असे त्यांचे नाव आहे.

हे दांपत्य दक्षिण किनाऱ्यावरील चिलवर्थ भागात राहते. काही महिन्याआधी त्यांच्याकडे पोलंडमधील एक व्यक्ती काम मागण्यासाठी आली होती. या दांपत्याने राहण्याच्या व खाण्यापिण्याच्या अटींवर त्याला कामावर ठेवले. पण प्रत्यक्षात ते त्याला शिळे व सडलेले अन्न खायला देत. तसेच राहायला खोली न देता एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी त्याला ठेवले. याबदद्ल नोकराने त्यांना विचारताच ते त्याला मारझोड करत होते. अखेर या सर्व जाचाला कंटाळून नोकराने एका सामाजिक संस्थेकडे याबद्दल तक्रार केली. त्यानंतर प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर या दांपत्याला अटक करण्यात आली.