
चीनसोबत झटापटीत हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट असून चीनच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. रेल्वेने चायनीज कंपनीचे 471 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केले आहे.
चायनीज कंपनी बीजींग नॅशनल रेल्वे रिसर्च ऍन्ड डिझाईन य कंपनीसोबत हिंदुस्थान रेल्वेने कानपूर ते दीन दयाल उपाध्याय रेल्वे स्थानकदरम्यान सिग्नल आणि टेलिकॉमचे कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट तब्बल 471 कोटी रुपयांचे होते. जून 2016 साली हे कंत्राट देण्यात आले होते. परंतु चार वर्ष होऊनही या प्रकल्पाचे फक्त 20 टक्के काम झाले आहे. हे काम खूपच धीम्या गतीने होत होते. म्हणून हिंदुस्थाने हे कंत्राटच रद्द करण्यात आले आहे.
BSNL कडूनही Boycott Chinese
BSNL नेही चायनीज वस्तूंवर बहिष्कार घातला आहे. BSNL च्या 4 जी यंत्रणा उपग्रेड करण्यासाठी चीनच्या वस्तूंचा वापर करणार नाही असे दूर संचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या बाबत नवीन कंत्राट काढले जातील. तसेच चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार असल्याचे BSNLने म्हटले आहे.


























































