
देशातील प्रवासी भाड्यांमध्ये बदल करत भारतीय रेल्वेने रविवारी नवी भाडे रचना जाहीर केली. ही नवी रचना 26 डिसेंबर 2025 पासून लागू होणार असून, या निर्णयामुळे रेल्वेला सुमारे रुपया 600 कोटी अतिरिक्त महसूल मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय रेल्वे ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रोजगार देणारी संस्था आहे.
नव्या भाडे रचनेनुसार, 215 किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. साध्या (ऑर्डिनरी) वर्गात 215 किमीपुढील प्रत्येक किमीमागे 1 पैसा अतिरिक्त आकारण्यात येणार आहे. तर मेल–एक्स्प्रेस नॉन-एसी आणि एसी वर्गात 215 किमीपुढील प्रत्येक किमीमागे 2 पैसे जादा मोजावे लागणार आहेत.
मात्र, 215 किमीपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे लहान अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा थेट फटका बसणार नाही.
याशिवाय, उपनगरी रेल्वे सेवा तसेच मासिक पासच्या दरांमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि उपनगरी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, अनेक वर्षांनंतर प्रवासी भाड्यात मर्यादित स्वरूपात सुधारणा करण्यात आली असून, यामुळे महसूल वाढीस मदत होणार आहे. मात्र, वाढ केवळ दीर्घ अंतराच्या प्रवासापुरती मर्यादित ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य प्रवाशांवरील भार कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
The Railway has announced a new fare structure effective from December 26, 2025, with no fare increase for journeys under 215 km in Ordinary Class. For journeys beyond 215 km, there will be a fare hike of 1 paise per km in Ordinary Class, and 2 paise per km for Mail/Express… pic.twitter.com/lD4fUQ8eeK
— ANI (@ANI) December 21, 2025




























































