रेल्वेचा मोठा निर्णय, तिकीट खिडकीवर काढलेल्या तिकीटांचाही रिफंड मिळणार,

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिकीट खिडकीवरुन बुकिंग करणाऱ्यासाठी सुद्धा रद्द करण्यात आलेल्या रेल्वे तिकीटांचा रिफंड देण्याची सोय आयआरसीटीसीने केली आहे. रेल्वेने 3 मे 2020 पर्यंत रद्द केलेल्या रेल्वे तिकीटांचा ‘रिफंड’ केवळ आतापर्यंत केवळ ऑनलाइन तिकटे बुक करणाऱ्यासाठी खुला ठेवला होता. मात्र आता रेल्वेच्या हेल्पलाईन क्र.139 वरून काही पर्याय वापरताच ग्राहकांना घरबसल्या त्यांच्या तिकिटांचा परतावा मिळणार आहे.

कोरोना जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 3 मेपर्यंत सर्व प्रवासी ट्रेन रद्द करीत तिकीट बुकिंग बंद केले होते. मात्र या ट्रेन रद्द करण्यात आल्यामुळे ज्यांनी तिकीटे  ऑनलाईन बुक केली होती केवळ त्यांच्याच बँक खात्यात रिफंडची रक्कम स्वयंचलितपणे पाठविली जात होती. ज्यांनी काउंटरवर तिकीट बुक केले होते. त्यांची सर्व आरक्षण केंद्रे बंद झाल्याने अडचण झाली होती. त्यांना दिलासा देण्यासाठी रेल्वेची तिकिट यंत्रणा सांभाळणार्रा आय‌आरसीटीसीने रेल्वे हेल्पलाईन क्र.139 वरुन काही पर्याय वापरताच रिफंडची रक्कम स्वयंचलितपणे त्यांच्या खात्यात वळविण्याची सोय केल्याचे आय‌आरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी म्हटले आहे. आय‌आरसीटीसीच्या खालील वेबसाईट लिंकवरूनही https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf तिकीटे रद्द करता येणार असल्याचेही पिनाकीन यांनी स्पष्ट केले आहे. प्रवासी 31 जुलै 2020 पर्यंत परतावा  मिळवू शकणार आहेत.

आतापर्यंत 725 कोटींचा रिफंड वाटला
कोविड -19 मुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रीमियम गाड्या, मेल-एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल, कोकण रेल्वे इत्यादी सर्व प्रवासी रेल्वे सेवा 3 मे 2020 पर्यंत रद्दच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अद्याप रद्द न केलेल्या गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण रद्द करणा-यांना देखील पूर्ण परतावा मिळणार आहे. आतापर्यंत देशभरात 1.05 कोटींहून अधिक प्रवाशांनी तिकीटे रद्द केली असून 725 कोटी रुपये रिफंडची रक्कम त्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे.