
गेल्या 167 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने तिकिटाच्या बुकिंगद्वारे होणाऱया कमाईपेक्षा कोरोनाने गाडय़ा रद्द झाल्यामुळे प्रवाशांना तिकिटाचा रिफंड अधिक दिला आहे. या आर्थिक वर्षांत रेल्वेला 40 हजार कोटींचा तोटा झाला आहे. रेल्वेला 2020 – 21च्या पहिल्या तिमाहीत (निगेटिव्ह) वजा -1,066 कोटींचा महसूल मिळाला आहे. म्हणजे या तिकीट कमाईच्या रकमेतून यापेक्षा जादा रक्कम रिफंड म्हणून वाटण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी केलेल्या माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी मिळाली आहे.
23 मार्चपासून कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे मेल-एक्प्रेस, पॅसेंजर गाडय़ा बंद पडल्याने तिकीटे रद्द होऊन आगाऊ तिकीटे आरक्षण करणाऱयांना रेल्केला कोणतीही वाटछाट न करता परतावा द्यावा लागला. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये – 531.12 कोटी रू., मे महिन्यांत -145.24 कोटी तर जून महिन्यांत -390 कोटी रूपये निगेटिव्ह महसुल मिळाला. ही वजा रक्कम हे दर्शविते की रिफंडची किंमत तिकीट बुकींगच्या किंमतीच्या पेक्षा जास्त आहे असे रेल्केचे प्रवक्ते डी.जे.नरेन यांनी म्हटले आहे. सेवांना रद्द केल्याने एप्रिल, मे आणि जूनमध्ये प्रवासासाठी तिकीट बुक करणाऱयांना तिकीटांचा परतावा द्यावा लागला. मुळात या तीन महिन्यात प्रतिबंध असल्याने कमी तिकीटे बुक झाली होती असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.
2019-20 च्या पहिल्या तिमाही वर्षात एप्रिल महिन्यात रेल्वेने 4,345 कोटी रूपये, मे महिन्यात 4,463 कोटी रूपये तर जून महिन्यात 4,589 कोटी रूपये कमाई केली होती. यंदाच्या आर्थिक वर्षांत रेल्वेला लॉकडाऊनने 40 हजार कोटींचे न भुतो न भविष्यति नुकसान झाले आहे. रेल्वेचे प्रवासी उत्पन्न कोविडच्या साथीने कमी झाले असल्याचे नरेन यांनी स्पष्ट केले.
दोन आठवडय़ांत सुवार्ता मिळाली
मालवाहतुकीतून गेल्या दोन आठवडय़ांत तर गेल्या आर्थिक वर्षाच्या पेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. रेल्वेच्या दृष्टीने हे खूपच सकारात्मक चिन्ह असल्याचे या प्रवक्याने म्हटले आहे. लॉकडाऊनमध्ये मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी 1 मेपासून चालविलेल्या श्रमिक स्पेशल गाडय़ांमुळे देखील 2 हजार कोटींचा तोटा झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर आता कुठे मालवाहतुकीतून रेल्वेला दिलासा मिळत आहे.
…गेले ते मालवाहतूकीतून मिळविले
या तीन महिन्यांत जीवनाकश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाची साखळी कायम राखण्यासाठी रेल्के हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याने यात तीन महिन्यात मालवाहतुकीतून रेल्वेने त्याची भरपाई केली आहे. एप्रिल 2020मध्ये मालवाहतुकीतून 5,744 कोटी रू. मे महिन्यात 7,289 कोटी रू. आणि जून महिन्यात 8,706 कोटी रुपयांची रेल्वेला कमाई झाली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिलमध्ये 9,331 कोटी रू. मे महिन्यात 10,032 कोटी रू. आणि जून महिन्यात 9,702 कोटी रूपयांची कमाई झाली होती.























































