परदेशातून हिंदुस्थानी मुंबईत परतणार; 88 हॉटेलमध्ये 3,343 कोरोना क्वॉरंटाईन सेंटर

1129
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या हिंदुस्थानींपैकी जे हिंदुस्थानी मुंबईमार्गे देशात परतणार आहेत त्यांच्या क्वॉरंटाईनची व्यवस्था मुंबईतील हॉटेल्समध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने 88 हॉटेल्स ताब्यात घेतली असून त्यात 3 हजार 343 क्वॉरंटाईन सेंटर तयार केली आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात बहुतेक देशांनी लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये हिंदुस्थानी नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे देशात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारपासून सुरू झालेल्या पहिल्या प्रयत्नात 12 देशातून, 64 विमान फेऱ्या करून एकूण 14 हजार 800 प्रवासी देशात परतणार आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये एकूण सात विमानातून सुमारे 1,900 नागरिक येणार आहे. बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत. परतलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईन केले जाणार आहे. क्वॉरंटाईन कालावधी तपासणीनंतर ठरवण्यात येणार आहे. कोरोनाची लागण झाली असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यांच्या क्वॉरंटाईनसाठी मुंबईतील दोन, तीन, चार, पाच तारांकित हॉटेल्सबरोबर अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलदेखील ताब्यात घेण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या