हिंदुस्थानी नेमबाजांचा सराव सुरू, टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज होत असलेल्या खेळाडूंसाठी ट्रेनिंग

331

हिंदुस्थानी नेमबाज पुढल्या वर्षी होणाऱया ‘टोकियो ऑलिम्पिक’साठी सज्ज होत आहेत. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेली नवी दिल्ली येथील कर्णीसिंग शूटिंग रेंज ‘स्पोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडिया’च्या (साई) आदेशानुसार खुली करण्यात आली आहे. आता या शूटिंग रेंजवर टोकियो ऑलिम्पिकसाठी जवळपास पात्र ठरलेले खेळाडू बुधवारपासून सराव करीत आहेत.

केंद्र सरकार व ‘साई’च्या नियमानुसार नेमबाजांना सराव करता येणार आहे. नेमबाजांना ट्रेनिंगसाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे. या नियमाचे पालन केल्यामुळे शूटिंग रेंजवर नेमबाजांना सामाजिक अंतर ठेवता येणार आहे. यावेळी थर्मल स्क्रिनिंगलाही खेळाडूंना सामोरे जावे लागणार आहे. शिवाय प्रत्यक्षात शूटिंग रेंजवर सराव करताना दोन नेमबाजांमध्ये अंतर ठेवावे लागणार आहे.

वैयक्तिक उपकरणे शेअर करता येणार नाहीत
– नेमबाजांना सरावादरम्यान स्वताची उपकरणे शेअर करता येणार नाहीत. यामध्ये गन, स्पोर्ट्स जॅकेट, शूज यांचा समावेश आहे. तसेच खेळाडूंना हॅण्ड सॅनिटायझर, पाण्याची बाटली, टॉव्हेल व ग्लोव्हज या सर्व गोष्टी शूटिंग रेंजवर घेऊन याव्या लागणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या