
दक्षिण कोरियात नुकत्याच पार पडलेल्या 20व्या आशियाई रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संपुलाच्या स्केटर्स नायशा मेहता, रिधम ममाणिया आणि कॅरोलिन फर्नांडिस यांनी पदक विजेती कामगिरी करत हिंदुस्था आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले. नायशाने मुलींच्या 14 ते 17 वर्षे आणि रिधम ममाणियानेही मुलींच्या 11 ते 14 वर्षे वयोगटाच्या एकेरी नृत्य प्रकारात सोनेरी कामगिरी केली. तसेच रोलर डर्बीमध्ये कॅरोलिन फर्नांडिस हिने रौप्य पदक जिंकले. या दमदार यशानंतर ठाकरे क्रीडा संपुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्या हस्ते पदकविजेत्या स्केटर्सचे काwतुक करण्यात आले. या सर्व खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता आहे. त्यांच्याकडे सुवर्णपदक पटकावण्याची प्रचंड क्षमता असून, लवकरच त्यांच्या हिंदुस्थानी संघात निवडीची घोषणा होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे प्रभू म्हणाले.



























































