World Cup 2019 कोहली माझ्याहून सरस कर्णधार – कपिलदेव

2

सामना ऑनलाईन | चेन्नई

 यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानच्या संघापेक्षा कितीतरी बलाढय़ आहे. याचबरोबर विराट कोहली हादेखील माझ्याहून अधिक सरस कर्णधार आहे, अशा शब्दांत पहिल्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी कोहलीवर स्तुतिसुमने उधळली. कपिल म्हणाले, हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान दहा सामने झाले तर त्यातील सात हमखास हिंदुस्थान जिंकेल अशी परिस्थिती आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे कितीही बलाढय़ संघ असला तरी त्याचा पराभव कधी होईल हे सांगता येत नाही. आमच्यावेळचा पाकिस्तानचा संघ आताच्या पाक संघापेक्षा खूप प्रतिभावान होता.