क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग प्रसिद्ध; आयआयटी दिल्ली, मुंबईने मारली बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगची नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदा हिंदुस्थानातून आयआयटी दिल्लीने चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. आयआयटी दिल्लीने सर्वाधिक 6 विषयांच्या टॉप-50 मध्ये स्थान मिळवले आहे. हिंदुस्थान क्यूएस रँकिंगमध्ये संस्थांना मिळालेल्या प्रवेशामध्ये जगात चौथ्या क्रमांकावर आहे. सर्व विषयांच्या टॉप 50 मध्ये 4 आयआयटी, जेएनयू आणि बीआयटीएस पिलानी यांचा समावेश आहे.

ही विद्यापीठ रँकिंग लंडन येथील क्यूएस क्वाक्वेरेली सायमंड्सकडून प्रसिद्ध केली जाते. यादी प्रसिद्ध करण्याचे हे 16 वे वर्षे आहे. क्यूएस रँकिंग शंभरहून अधिक देशांमधील 1,900 विद्यापीठांमध्ये 55 विषय आणि फॅकल्टी सेक्टर्समध्ये समाविष्ट असलेल्या 21,000 हून अधिक विद्यापीठ कार्यक्रमांना बेंचमार्क करते. या वर्षी रँकिंगमध्ये हिंदुस्थानात 44 टक्के सुधारणा झाली आहे. या वर्षी हिंदुस्थानने 120 नवीन रेकॉर्ड एंट्री रँकिंगमध्ये समाविष्ट केल्या आहेत. तर अमेरिका 287 एंट्रीसह पहिल्या क्रमांकावर आहे.

चीनमधील 181 संस्थांना क्यूएस रँकिंगमध्ये स्थान मिळाले आहे. युनायटेड किंगडम 159 एंट्रीसह पाचव्या क्रमांकावर आहे. या वेळी कॉम्प्युटर सायन्सशी संबंधित हिंदुस्थानच्या सहा संस्था या यादीत समाविष्ट आहेत, तर गेल्या वर्षी फक्त 2 संस्थांना यात स्थान मिळाले होते. या वर्षी पहिल्यांदाच मार्केटिंग स्ट्रीममध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट आयआयएम अहमदाबादने स्थान मिळवले आहे. टॉप 50 मध्ये आयआयटी मुंबई, खडगपूर, मद्रास, जेएनयू आणि बिट्स पिलानी यांचा समावेश आहे.

हिंदुस्थानातील टॉप विद्यापीठे

  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली
  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई
  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास
  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर
  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बंगळुरू या विद्यापीठांचा समावेश आहे.