हिंदुस्थानी महिला आशियाई चॅम्पियन, इराणमधील बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हरिका द्रोणावल्ली, ईशा करवडे, पद्मिनी राऊत, वैशाली आर व आकांक्षा हगवणे या मुलींनी बुद्धिबळाच्या पटावर अचूक चाली रचत हिंदुस्थानला आशियाई नेशन्स कप या मानाच्या स्पर्धेतील ब्लिटझ् या प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. २०१६ सालानंतर हिंदुस्थानला या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकता आले आहे. याचसोबत रॅपीड बुद्धिबळ प्रकारात रौप्य व क्लासिकल बुद्धिबळ प्रकारात कांस्य पदक जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

इराणमधील हमादान येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हिंदुस्थानच्या महिला संघाने २१.५ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. व्हिएतनामच्या संघाने १८.५ गुणांसह रौप्य आणि चीनच्या संघाने १७.५ गुणांसह कांस्यपदकावर हक्क सांगितला.