
गोव्यातील मोपा एअरपोर्टवर बीएफएस इंडिया या ग्राऊंड हॅण्डलिंग पंपनीत काम करणाऱ्या कामगारांवर होणारा अन्याय, अपमानास्पद वागणूक, सवलती आणि पगारवाढीसंदर्भात भारतीय कामगार सेनेचे नुकतीच पंपनीच्या व्यवस्थापनासोबत चर्चा केली. त्यावर व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भारतीय कामगार सेनेवरील विश्वास दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम आणि सहचिटणीस सुजित कारेकर यांच्या प्रयत्नामुळे बीएफएस इंडिया या गोव्यातील मोपा एअरपोर्टवर ग्राऊंड हॅण्डलिंग पंपनीत काम करणाऱया सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला. संजय कदम यांनी कामगारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यानंतर भारतीय कामगार सेनेने पंपनीचे सीओओ पीयूष खन्ना यांच्यासोबत बैठक घेऊन कर्मचाऱयांचे प्रश्न मांडले. त्यावर पीयूष खन्ना यांनी युनियनच्या सर्व मागण्या मान्य करून कामगारांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस विजय तावडे, सुजित कारेकर, कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वारसे व बीएसएफची कमिटी मेंबर जयकरा गवस, दिनेश राऊळ, मयूर कणसे, दीपेश गोवेरकर, जयराम सावंत, राजदीप धुरी व कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे मनापासून आभार मानले.