मलायका अरोरा पैठणी आणि नथ पाहून भारावली

2841

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या डान्स रियारिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये नृत्य आणि विशेषत: लावणी या लोकनृत्य प्रकारात पारंगत असलेल्या ऋतुजा जुन्नरकरला साथ देत असल्याबद्दल परीक्षकांनी ऋतुजाच्या आई-कडिलांचे खूप कौतुक केले आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता म्हणून ऋतुजाच्या आई-वडिलांनी पुण्याहून खास मलायकासाठी एक सुंदर पैठणी आणि नथ आणली होती. पैठणी आणि नथ पाहून मलायका खूप भारावून गेली आणि नथ तर तिने लगेच घातली व ती पैठणी आपल्या खांद्यावर ठेवून आपली सहपरीक्षक गीताला तिने दाखवली. या शोच्या एखाद्या आगामी भागात मी ही पैठणी आणि नथ नक्की घालेन असे वचनच या वेळी मलायकाने दिले. अत्यंत मोठय़ा आणि चढाओढीच्या नृत्य-लढतीमधून बेस्ट बारा स्पर्धकांची निवड होताना बघा या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

आपली प्रतिक्रिया द्या