शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर उतरणार

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले हिंदुस्थानी शुभांशु शुक्ला हे उद्या अंतराळ सफरीहून परतणार आहेत. तब्बल 18 दिवस अंतराळ स्थानकात राहिल्यानंतर त्यांचे यान परतीच्या मार्गाला लागले आहे. सुमारे 22.5 तासांच्या प्रवासानंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी 3.01 वाजता शुभांशु यांचे यान कॅलिपहर्नियाच्या किनाऱ्यावर उतरेल.