दोन वर्षांत जंगले वाढली! वनमंत्र्यांनी सादर केला अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
New Delhi: Union Environment Minister Prakash Javadekar (C) along with officials releases the 'India State of Forest Report 2019, in New Delhi, Monday, Dec. 30, 2019. (PTI Photo/Atul Yadav) (PTI12_30_2019_000061B)

गेल्या दोन वर्षांत देशातील जंगले आणि एकूण झाडांमध्ये प्रचंड वाढ झाली असून देशाचे हरित क्षेत्र 5,188 वर्ग किलोमीटरने वाढले आहे, अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. त्यांनी हिंदुस्थानातील वनक्षेत्राची सध्याची स्थिती दाखवणारा अहवाल (आयएसएफआर) सोमवारी प्रकाशित केला. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, 2014 ते 2019 या पाच वर्षांत देशातील जंगल क्षेत्रात 13 हजार वर्ग किलोमीटरने वाढ झाली आहे. यात सघन वनक्षेत्र, विरल वनक्षेत्र आणि सामान्य वनक्षेत्र या सगळ्यातच वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे देशातील उत्सर्जित कार्बनचा साठा 4.26 कोटी टनांनी वाढला आहे. यामुळे आपण लवकरच पॅरिस करारात देण्यात आलेली ध्येये गाठू शकू, असेही ते म्हणाले. देशातील एकूण क्षेत्रफळांपैकी वनक्षेत्राची हिस्सेदारी आता 21.67 टक्के झाली आहे.

जंगलांच्या आगीचे प्रमाण घटले

हिंदुस्थानातील जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनाही 20 टक्क्यांनी कमी झाल्याचे जावडेकर यांनी या अहवालातून निदर्शनास आणले. पूर्वोत्तर हिंदुस्थानात जंगलांनी व्यापलेल्या क्षेत्रांमध्ये 765 वर्ग किलोमीटरची (0.45 टक्के) घट झाली असून मानवी हस्तक्षेप असलेला भाग 54 वर्ग किलोमीटरने (किमान 1.10 टक्के) वाढल्याचेही केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आसाम आणि त्रिपुरा वगळता पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये वनक्षेत्र घटले आहे. आयएसएफआर अहवाल दोन वर्षांतून एकदा प्रकाशित केला जातो.