हिंदुस्थान हिंदुराष्ट्र नाही, गृहमंत्री अमित शहांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. तसेच देशाचा धर्म हा संविधान आहे असेही शहा म्हणाले. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

मुलाखातीत त्यांना हिंदु राष्ट्रावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमित शहा म्हणाले की, ”हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र नाही. संपूर्ण देशाचा एकच धर्म आहे तो म्हणजे संविधान. देशात प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा आहे. संविधान हाच देशाचा धर्म आहे”, असेही शहा म्हणाले.

कलम 370 जेव्हा ठरवले तेव्हा संसदेत बहुतांश लोक हे काँग्रेसचे होते. तेव्हाच तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की हे कलम घासून घासून संपले जाईल. आम्ही ते संपवले असे अमित शहा म्हणाले. हे कलम कायमस्वरुपी नाही असे काँग्रेसनेच म्हटले होते, असेही शहा यांनी नमूद केले.