
झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी सोमवारी हिंदुस्थानचा संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यासाठी बऱ्याच युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. या दौऱ्यात हिंदुस्थान तीन टी 20 सामने खेळणार असून त्यासाठी हा संघ जाहीर करण्यात आला आहे. हिंदुस्थानचा संघ 23, 25 आणि 26 जुलै या दिवसांमध्ये टी 20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने हरारे येथे होणार आहेत.
हिंदुस्थानचा संघः श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उप कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयांक यादव आणि प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).


























































