गुगल मॅपला टक्कर देणारे स्वदेशी मॅपल्स

iegieue मॅप्सला टक्कर देणाऱ्या एका स्वदेशी अ‍ॅप्सची सध्या देशभरात चर्चा आहे. ‘मॅपल्स’ असे या अ‍ॅपचे नाव आहे. मॅपमायइंडिया या हिंदुस्थानी कंपनीने तयार केलेल्या या अ‍ॅपमध्ये व्हॉईस गाइडेड नेव्हिगेशन, रिअल-टाइम ट्रफिक अपडेट्स आणि हायपर-लोकल सर्च अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळेच हे अ‍ॅप गुगल मॅप्सचा मजबूत असा स्वदेशी पर्याय ठरत आहे.

‘मॅपल्स’ अ‍ॅप उपक्रम डिजिटल आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असा दावा सरकारने केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लवकरच रेल्वेसोबत करार करण्यात येईल. त्यामुळे रेल्वे स्थानके आणि मार्गांच्या नेव्हिगेशनमध्येही अधिक अचूकता येईल. याअंतर्गत देशातील दर 3.8 किमीसाठी एक डिजिटल कोड दिला जाणार आहे. युजर्स मॅपला फक्त पिन लावून आपला डिजिटल अ‍ॅड्रेस तयार करू शकतात. त्यामुळे घर, मजला किंवा इमारती अचूकपणे ओळखता येतील.