आकाशातच इंडिगोच्या विमानाचे इंजिन पडले बंद, 160 प्रवाशांचा जीव टांगणीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाखापट्टणम येथून दिल्लीला जाणाऱया 160 प्रवाशांचा जीव आकाशामध्येच टांगणीला आला. इंडिगो एअर लाईन्सच्या विमानाचे एक इंजिन अचानक बंद पडले. विमानाला अचानक प्रचंड हादरे बसू लागल्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. मात्र, दुसऱया इंजिनाच्या आधारे विमानाचे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरर्रीष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला. विमान उतरल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, या प्रकरणाची डीजीसीएने चौकशी सुरू केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंडिगोचे बोइंग 737-800 विमान सकाळी 10.39 वाजताच्या सुमारास दिल्लीच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत होते. त्यावेळी विमानाला अचानक मोठे हादरे जाणवू लागले. विमानाच्या इंजिन क्रमांक एकमध्ये बिघाड निर्माण झाला आणि काही वेळात ते बंद पडले. अशा स्थितीत वैमानिकांनी आणीबाणी जाहीर करून दिल्ली विमानतळाला तत्काळ संपर्क करून मदत मागितली. त्यानंतर विमानतळावर आणीबाणी जाहीर केल्यानंतर विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. 10.59 मिनिटांनी 28 क्रमांकाच्या धावपट्टीवर विमान सुखरूप उतरवण्यात आले आणि सर्व प्रवासी तसेच चालक दलाच्या सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

तुर्कीयेकडून भाडय़ाने घेतलेले विमान

इंडिगोच्या ज्या विमानाचे इंजिन बंद पडले, ते तुकाaच्या कोरेनडन एअरलाइन्सकडून भाडय़ाने घेण्यात आलेले आहे. लँडिंगच्या आधी तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यानंतर वैमानिकांनी संपूर्ण काwशल्य पणाला लावून विमान सुरक्षितपणे उतरविले. अधिकाऱयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून विमानाची तपासणी करण्यात येत आहे. घटनेची चौकशी करण्यात येत आहे, असे डीजीसीएने सांगितले.