महान व्यक्तिमत्त्व इंदिरा गांधी यांच्याबद्दलचे वक्तव्य मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंदिरा गांधी या आमच्यासाठी एक महान व्यक्तिमत्त्व आहेत. करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या वक्तव्याने इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला ठेच पोहचली असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेत असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

इंदिरा गांधी या देशाच्या सर्वोच्च, प्रभावशाली नेत्या आणि प्रखर राष्ट्राभिमानी नेत्या होत्या. आमच्याकडून इंदिरा गांधी यांची प्रतिमा भंग होणार नाही. जेव्हा इंदिरा गांधींविषयी कोणी टीकाटिप्पणी करत असे तेव्हा काँग्रेसमधील माझे मित्र गप्प बसायचे, पण मी त्यांची बाजू उचलून धरायचो असे स्पष्ट करत शिवसेना नेते राऊत यांनी पुणे येथील कार्यक्रमातील वक्तव्य मागे घेत असल्याचे सांगितले.

हेतू साफ – आदित्य ठाकरे
दरम्यान शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राऊतसाहेब यांचा हेतू साफ होता. एका वेगळ्या संदर्भाने ते बोलले होते. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिल्याचे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच इंदिरा गांधींचा आदर केला आहे. त्यामुळे कुठलाही शिवसैनिक त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोलणार नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.