कमलनाथ लिफ्ट दुर्घटनेतून बचावले

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ इंदूरमधील लिफ्ट दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. रविवारी कमलनाथ आणि इतर काँग्रेस नेते असणारी लिफ्ट 10 फूट खाली कोसळून दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर लिफ्टचे दरवाजे उघडत नसल्याने इंजिनीअरला बोलावण्यात आले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. काँग्रेसने ही सुरक्षेतील खूप मोठी त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. कमलनाथ आणि इतर नेते माजी मंत्री रामेश्वर पटेल यांना भेटण्यासाठी इंदूरमधील एका खासगी रुग्णालयात गेले होते. यावेळी काँग्रेस नेते सज्जनसिंग वर्मा आणि जितू पटवारी त्यांच्यासोबत होते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी लिफ्टचा वापर केला. मात्र यावेळी लिफ्टमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले.

आपली प्रतिक्रिया द्या